सातारा तालुक्यात पाठ्यपुस्तकांचे वितरण


स्थैर्य, सातारा, दि. 12 : समग्र शिक्षा अभियानअंतर्गत सातारा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून त्याच्या वितरणाचे काम सुरु असल्याची माहिती सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी दिली.

सातारा विकासगटातील जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित, खाजगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी सुमारे २ लाख २५ हजारांहून अधिक पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. कोडोली येथील प्राथमिक शाळेतून तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत ही पुस्तके वितरणाचे काम सुरू आहे. तालुक्यातील एकूण २४ केंद्रांतील शाळांत ती वितरीत केली जात आहेत. या कामी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, प्रतिभा भराडे, जयश्री शिंगाडे, जयश्री गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व केंद्रप्रमख, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक यांचे सहकार्य लाभले असल्याचे श्री. धुमाळ यांनी नमूद केले. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!