
स्थैर्य, राजुरी, दि. 26 : राजुरी ता. फलटण येथे कोरोना या महामारीच्या रोगावर येणार्या जाणार्या लोकांची नोंद ठेवण्यासाठी तसेच प्रतिबंधक उपाय होम कॉरंटाईनचे शिक्के मारण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर राजुरी येथे चेक पोस्ट आहे. सदरील चेकपोस्टवर शिक्षक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलीस प्रसाशनाचे कर्मचारी हे अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा सर्व कर्मचार्यांना राजुरी येथील जावेद शेख, फिरोज शेख व समिर शेख या बांधवानी रमजान ईदच्या पवित्र दिनी शिरखुर्म्याचे वाटप केले. बर्याचदा समाजाचे आपणही काहीतरी देणे आहे, या उद्देशाने अत्यावश्यक सेवेत काम करत असणार्या सर्वांचे मनोबल वाढावे म्हणुन राजुरी परिसरातील नागरीकांकडून चहा, नाष्टा, सरबत, फळे व इतर गोष्टिंचे वाटप होत असते. चेकपोस्टवरील अत्यावश्यक सेवेत काम करत असणार्या सर्वांनी शेख बंधुंचे आभार मानत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.