दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठाचीवाडी येथे पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण या दृष्टिकोनातून ‘सीड बॉल्स’चे वाटप केले.
सीडबॉल्सच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची एक अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना कृषीकन्यांनी बालमनावर रुजवली. योग्यप्रकारे रुजवन होईल अशा ठिकाणी सीड बॉल्स फेकावेत, असे आवाहन कृषीकन्यांनी विद्यार्थ्यांना केले व त्यांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथील ध्वजारोहण सरपंच सौ. जयश्रीताई भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष व गावचे उपसरपंच श्री. काकासो कदम यांच्या हस्ते झाले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण फौजी श्री. रोहित धनवडे व श्री. अमित धनवडे यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर आर्मी रिटायर नाईक सुभेदार श्री. दत्तात्रय भोसले, ऑर्डीनरी नायब सुभेदार श्री. दिलीप भागवत भोसले, सुभेदार श्री. लालासाहेब कदम, नायक सुभेदार श्री. सुहास लामकाने, हवालदार श्री. उमेश शेलार, पोलीस कॉन्स्टेबल श्री. सुहास जगदाळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, त्यांचा संपूर्ण स्टाफ व त्याचबरोबर मठाचीवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, पूजा मारवाडी, समृद्धी कुंजीर, प्राजक्ता ननावरे, साक्षी शिंदे, शिवांजली धुमाळ, हर्षदा लोखंडे व समृद्धी उल्हारे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.