सौ. स्वातीताई जाधव यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप


दैनिक स्थैर्य । 19 जून 2025 । फलटण । श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली जाधववाडी ग्रामपंचायत सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वातीताई जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या वाटप केले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांनी साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपसल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने वर्गशिक्षकवसंत जाधव यांनी सत्कार करुन आभार मानले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दारासिंग निकाळजे, माजी सरपंच मुनिष जाधव, उपसरपंच राहुल शिंदे, माजी सरपंच बाळासो शिंदे, उपसरपंच दिपक सपकाळ, ग्रामपंचायतीचे सदस्य गोविंद घनवट (तात्या), सदस्या सौ. मंगलाताई घनवट, निलेश जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब महानवर, दादासो जाधव, सुरज शिंगाडे व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!