दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२३ | फलटण |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगवी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मनसेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी इयत्तेतील शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व खोडरबर असे साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी फलटण शहर व तालुक्यातील मनसेचे नीलेश जगताप, गणेश नलवडे, अभिजित गाडे, गणेश जाधव, दिनेश घोलप, प्रवीण घोलप, साहिल मुलाणी, अजय खुडे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत प्राथमिक शिक्षक संदीप बनकर यांनी केले. दत्तात्रय येळे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका सुरेखा निंबाळकर यांनी आभार मानले.