दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
समाजातील गरजू व उपेक्षित महिलांना साड्या वाटप करणे हा संगिनी फोरमचा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे सर यांनी काढले.
सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या संगिनी फोरम, फलटण यांच्याकडून फलटण बसस्थानकावर स्वच्छतेचे कार्य करीत असलेल्या महिला तसेच समाजातील गरजू-उपेक्षित महिलांना साडी व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गावडे सर बोलत होते.
सामजिक बांधिलकी म्हणून संगिनी फोरमने केलेल्या कार्याचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे व उपेक्षितांना मदत केली पाहिजे, असे गावडे सर यांनी यावेळी नमूद केले.
संगिनी अध्यक्षा अपर्णा जैन यांनी प्रास्ताविकात संगिनी फोरमच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली.
यावेळी संगिनी फोरम अध्यक्षा अपर्णा जैन, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे, जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, उपाध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनी फोरमच्या सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, उपाध्यक्षा मनिषा व्होरा, माजी अध्यक्षा निना कोठारी, माजी सचिव पौर्णिमा शहा, संचालिका सारिका दोशी, सदस्या संध्या महाजन, सुरेखा उपाध्ये, सारिका सचीन दोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगिनी सदस्यांनी परिश्रम घेतले. खजिनदार मनिषा घडिया यांनी आभार मानले.