सहआयुक्त तुषार मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना रेंजर सायकलचे वितरण


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । फलटण । फलटणचे सुपुत्र व आयकर विभागाचे सहआयुक्त तुषार मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौशल्या फौंडेशनचे अध्यक्ष तथा सुरवडी विकास सोसायटीचे चेअरमन शांताराम मोहिते यांनी ज्ञानांकुर वारकरी संस्थेच्या शिक्षण घेत असलेल्या अनाथ मुलांना रेंजर सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी समाजातील शिक्षण घेवू इच्छित असणारे परंतु परिस्थिती नसणार्या मुलांना आज कौशल्या फौंडेशन व सुरवडी विकास सोसायटीच्या माध्यमातून जे सहकार्य करण्यात आले आहे, त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आयकर विभागाचे सहआयुक्त तुषार मोहिते यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप मोहिते यांनी केली. यावेळी संदिप मोहीते, माने मॅडम, कदम सर, कुमार भोई, माधव जमदाडे, सुखदेव अहिवळे, विशाल काकडे व ज्ञानांकुर शिक्षण संस्थेचे संचालक ह. भ. प. संकेत यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!