दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । फलटण । कोविडच्या अडचणीच्या काळात गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या मदत कक्षातर्फे विविध उपक्रम राबवून नागरिकांना आधार व मदत केली जात आहे. त्यानुसार मेडिकलसाठी मदत, मास्क, सॅनिटायजरचे वाटप व गरजूंना किराणा मालाचे वाटप आजपर्यंत करण्यात आले असून सर्व सभासदांचे संमतीने वाखरीतील अंगणवाडीमध्ये असणार्या साऊ माऊ पात्र 14 मुलांचे चांगल्या पोषणासाठी खारीक, खोबरे, खजूर, राजगिरा चिक्की, फुटाणे, शेंगदाणे, गूळ अशा कोरड्या वस्तूंची 14 कीटस् पर्यवेक्षिका कस्तुरे, अंगणवाडी सेविका आतार, ढेकळे व सूळ यांचेकडे सूपुर्द करण्यात आली. यावेळी मदत कक्षाचे कार्यकर्ते भानुदास ढेकळे यांनी मदत कक्षाची ध्येय व केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील योजनांची माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंभार, विजय इंदलकर, रमेश मोहिते यांनी सहकार्य केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र सूळ, रमेश मोहिते व ढवळ बीटातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
या मदतीबद्दल अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका कस्तुरे यांनी कोविड मदत कक्षाचे कामाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.