
दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । पोलिओनंतर रोटरीने आता क्षयरोगावर लक्ष केंद्रित केले आहे. रोटरी इंडिया ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि केंद्रीय टीबी विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी २०२५ पर्यंत भारतातील क्षयरोग निर्मूलनासाठी सामंजस्य करार केला आहे. हा प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाचा एक भाग आहे. या उपक्रमांतर्गत आज शताब्दी रुग्णालयात समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील १०० रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
सदर किट दर महिन्याला १ वर्षासाठी दिले जाणार आहेत. खासदार श्री राहुल शेवाळे आणि सौ.वैशाली शेवाळे यांचे बंधू डॉ.नवीन शेवाळे यांच्या हस्ते रुग्णांना या किटचे वाटप करण्यात आले. आजचे किट वितरण १ ते ७ सप्टेंबर २२ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या अनुषंगाने करण्यात आले.