
दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये कमिन्स कंपनीतर्फे विशेष उपक्रमांतर्गत कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि आरोहणम संस्थेच्या माध्यमातून आरोहणमच्या सरोज बडगुजर तसेच त्यांचे सहकारी सचिन काळुखे, मनीष काकडे, अविनाश खोमणे यांनी प्रशालेस भेट देवून सर्व शिक्षकांना औषधी वनस्पतींची ओळख व माहिती दिली. तसेच प्रत्येक शिक्षकांना या वनस्पतींची रोपे भेट दिली.
प्रशालेच्या इच्छुक पालकांनासुद्धा याचा लाभ देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. उपशिक्षक साबळे यांनी आभार मानले.