
स्थैर्य, ढेबेवाडी, दि. 28 : मंदुळकोळे, ता.पाटण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक वार्ड मध्ये मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकार शक्ती वाढविणार्या गोळ्यांचे वाटप तसेच गावातील लोकांची मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.
कोरोनारोगामुळे गावातील लोकांना कामधंदा नसल्याने भटक्या व गरीब लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या लोकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ढेबआळी, पाटील आवाड, कदम आवाड, जोंजाळवाडी, अण्णासाहेब पाटील नगर, भीमनगर या ठिकाणी 15 हजार मास्क व 1500 सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
लोकांच्या अडचणींवर लगेच तोडगाग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची तपासणी करण्यात येत असून लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर लगेच तोडगा काढण्यात येत आहे. लॉगडाऊनमध्ये गावात सर्व ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. बाहेर गावच्या लोकांना गावात येण्यास बंदी घातली आहे.