रविंद्र पिसाळ यांच्यावतीने तरडफ ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप


स्थैर्य, तरडफ दि. २ : तरडफ (ता.फलटण) येथील माजी सरपंच व विघमान ग्रामपंचायत सदस्य रविद्र पिसाळ यांनी कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गावातील लोकांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर बॉटल व एन 95 मास्कचे वाटप केले आहे. गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत वाटप व्हावे यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व साहित्य त्यांनी सुपूर्द केले आहे.

यावेळी ग्रामसेविका काशिद, विलास कदम, बाबूराव राजपुरे, हणमंत पिसाळ (मुकादम), मोहन मदने, दादा ढवळे, दादा मोरे, शिवाजी सोळसकर, गणेश सोळसकर, रोहित गोडसे, राहूल राऊत, गणेश कुंभार सतीश ढेंबरे, कालीदास गोडसे, हणमंत गोडसे,नवाज मुलाणी, शब्बीर मुलाणी, प्रशांत माने अराविद गोडसे आदी उपस्थित होते.

प्रत्येकाने आता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना महामारीत अनेक जवळच्या लोकांना त्रास झाला आहे. गावातील लोकांना सॅनिटायझर आणि मास्कचे वापर करुन आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रविंद्र पिसाळ यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!