स्थैर्य, फलटण : तरडगाव ता. फलटण येथील नागरिकांना करोना या महाभयंकर आजराचा सामना करण्यासाठी कमिन्स या मल्टिनॅशनल कंपनीने १८०० मास्क व 1800 सॅनिटायझरच्या बॉटल्स तरडगाव ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केल्या. मास्क व सॅनिटायझर तरडगाव ग्रामपंचायतीकडून घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.
कमिन्सच्या वतीने तरडगाव ग्रामपंचायतीला औषध फवारणीसाठी पंप, हायड्रो फिनिक्स औषध व बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी साठी थर्मामीटर हि देण्यात आलेला आहे. सदर करण्यात आलेल्या मदतीबद्दल तरडगाव ग्रामस्थांच्या वतीने तरडगावच्या सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच दिपक गायकवाड, ग्रामसेवक दादासाहेब धायगुडे यांनी आभार मानले. कमिन्स कंपनीचे प्रविण गायकवाड, संकल्प साताराचे संतोष शेलार, माजी सरपंच अतुल गायकवाड यांची पण मोलाची साथ सदरील उपक्रमास लाभली.