दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । फलटण । श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर फलटणचा पालखी तळ हा विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून साफसफाई केली जाते. त्या साठी सुमारे पाच हजार सामाजिक कार्यकर्ते पालखी तळ स्वच्छतेसाठी आलेले होते. त्या सर्वांना क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने मास्क व हॅण्डग्लोजचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सॅटेलाईट रोटरी क्लबचे चेअरमन श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, माजी नगरसेवक अजय माळवे, बाळासाहेब खानविलकर, अमरसिंह खानविलकर, मुधोजी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबासाहेब गंगावणे, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय कापसे, बाळासाहेब ठोंबरे, फलटण एज्युकेशन सोसायटी गर्व्हनिंग कौन्सिलचे सदस्य नितीन गांधी, शिरिष दोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, शिरिष दोषी व मान्यवरांच्या हस्ते मास्क व हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले.