दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
‘जय भवानी जय शिवाजी’ गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ, कुंभार गल्ली, फलटण यांच्या वतीने भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्रीं’ची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश पवार व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.
या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला. महाप्रसाद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. या सप्ताहात लहान मुलांसाठी त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उत्तीर्ण स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले.
या महाप्रसादाचे नियोजन करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.