बेरी कॅलीबट कंपनीकडून कटफळ शाळेला साहीत्य वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । बारामती । सोमवार दि. 01 ऑगस्ट रोजी कटफळ येथील जिल्हा परिषद शाळेला एमआयडीसी परिसरातील बेरी कॅलीबट कंपनीकडून सीएसआर मधुन साऊंड साहित्य , ग्रीनबोर्ड, प्रिंटर साहित्य , एल ई डी साहीत्य अशा प्रकारे शाळेला सुपूर्द करण्यात आले. यावेळी कंपनीकडून पुढे सीएसआर माध्यमातून अनेक कामे केली जाणार आहेत व शाळेसाठी आवश्यक मदत केली जाणार आहे असे सांगीतले.

यावेळी कंपनीचे अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व शाळेच्या वतीने साहीत्य दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सरपंच पुनम किरण कांबळे , उपसरपंच सिमा सिताराम मदने , सदस्य संध्या मोरे , कंपनीचे अधिकारी राजेंद्र सोनंदकर , अमोल नाईक व शाळेचे मुख्याध्यापक अलका खलाटे व शाळेतील शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!