दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । मुंबई । उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या नवउद्योजकांचा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ‘अर्थसंकेत – महाराष्ट्र गौरव २०२१’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्यांनी जोखीम घेऊन उद्योग उभा केला, रोजगार निर्माण केले, समाजाचे देणे फेडले, तसेच महाराष्ट्राचे नाव मोठे केले, अशा मराठी माणसांचा सन्मान करताना विशेष आनंद झाल्याचे श्री. देसाई म्हणाले.
श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अर्थसंकेतच्या महाराष्ट्र गौरव २०२१ सोहळा पार पडला. संस्थेचे संस्थापक डॉ. अमित बागवे उपस्थित होते. यावेळी श्री. बागवे लिखित व्यवसाय वाढीसाठी व्हाटस्अप मार्केटिंग या पुस्तकाचे प्रकाशन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निकेतन तावरे व निर्मला तावरे -( निर्मलाज ब्राईटवेज एम बी ए क्लासेस), मनीषा कोळी – (सारंग हँडीक्राफ्ट), वैभव घोबाळे – (क्रांती उद्योजकता एकता केंद्र), श्रीकांत लचके – (मेड इन स्वदेशी चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर), ॲडव्होकेट शिवांगी झरकर – (कॉर्पोरेट अँड बिझनेस लॉयर), अजिंक्य देव -(देव मसाले), डॉ. संदीप माळी – (जनसेवा पतसंस्था), कै. मनोहर नाईक (जागतिक संमोहनतज्ञ) यांच्या वतीने विकास नाईक, प्रा. राकेश कांबळी, प्रमोद वराडकर – (महापुरुष बालदीप मंडळ), शरद मल्टिस्टेटचे विनायक आ. राठोड, प्रदीप सांडगे आणि कोरोना योद्धा पत्रकारा सुभाष साळुंखे यांना ‘अर्थसंकेत – महाराष्ट्र गौरव २०२१’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.