
स्थैर्य, फलटण, दि.१९: जान्हवी सामाजिक संस्था सस्तेवाडी यांच्या वतीने कोरोना या जागतिक महामारीत सस्तेवाडी या गावात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दा यांना सन्मान चिन्ह व कोरोना पासुन बचावासाठी स्टिम वेपोराईझर मशिन देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी ग्रामविकास अधिकारी सुतार आण्णा, ग्रामपंचायत प्रशासक चौधरी साहेब,मा. सरपंच राधिका जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष सतिष आप्पा सस्ते, पोलिस पाटील सोनल धुमाळ, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे, सुनिल वाबळे, विश्र्वास चव्हाण, संजय कदम, शिवराज कदम, हरि चव्हाण, प्रताप सस्ते, किशोर पिसे यांचेसह गावातील सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेवक,डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चव्हाण, उपाध्यक्ष राहुल चव्हाण,सचिव प्रतिक्षा दराडे,यांनी संस्थेच्या वतीने गाव कोरोना पासुन सुरक्षित राहण्यासाठी शक्य ते सहकार्य करण्याचा कसोशिने प्रयत्न करणार असुन लवकरच गावातील पेशंट साठी पोर्टेबल आॅक्शिजन मशिन उपलब्ध करून दिली जाणार असुन यासाठी गावातील सधन लोकांकडुन अपेक्षित मदत मिळत असल्याचे जाहीर केले.
संस्थेने सुरूवातीलाच लोकप्रिय कामांना सुरूवात केल्याने नागरीकांनी संस्थेचे मनापासुन आभार व्यक्त केले.