दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरो घरी तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सफाई कर्मचारी कॉलनी परिसरात राजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय ध्वजाजे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी राजे गटाचे युवा कार्यकर्ते प्रितसिंह खानविलकर, अमर पिसाळ, डॉ.सागर निकम, ओंकार चोरमले यांनी पुढाकार घेतला.
येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर भारतीय ध्वज लावावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
यानुसार शहरात राजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ध्वज वाटपाचा उपक्रम राबवला जात असून प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा, असे आवाहन उपक्रमादरम्यान प्रितसिंह खानविलकर यांनी केले.
यावेळी काठीयावाडी मेहतर समाज विकास मंडळ, फलटणचे अध्यक्ष अशोक मारुडा, देवदास वाळा, राजु मारुडा, हिरालाल वाळा, लालासो डांगे, मनोज मारुडा, सुरज मारुडा, प्रमीत डांगे, नितीन वाळा, सुनिल मारुडा, लखन डांगे, प्रवीण डांगे, अनिल डांगे, दिपमला वाघेला, संजू वाळा, मिना गलियल, कमल गलियल, नंदा मारुडा, राधा वाळा, निखील वाळा, अमन वाळा, विनोद मारुडा, रोहीत मारूडा आदींसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.