
स्थैर्य, सातारा, दि. 01 : करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुण्याचे आयकर उपायुक्त तुषार मोहिते कुटुंबीय, दुधेबावी ग्रामपंचायत आणि दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहभागाने गावातील सर्व 900 कुटुंबांना होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वितरण करण्यात आले असून सदर गोळ्या सकाळी अनुष पोटी सलग तीन दिवस घ्यावयाच्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुधेबावी गावामध्ये मुंबई-पुणे व इतर जिल्ह्यातून 43 लोक आले असले तरी सर्व 43 जणांना होमक्वारंटाईन केले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सरपंच मधुकर वावरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, ग्रामविकास अधिकारी एस.आर. बोबडे, ग्रामपंचायत सदस्य, दक्षता कमिटीतील सदस्य त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. 43 लोकांमधील 14 दिवस पूर्ण झालेले 14 लोक असून उर्वरीत 29 लोक 14 दिवस पूर्ण क्वारंटाइन राहणार आहेत. कोविड 19 या रोगाचा संसर्ग पसरु नये म्हणून होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम 30 गोळयांचे वितरण करण्यात आले आहे. या गोळ्या प्रत्येक व्यक्तीने रोज सकाळी उपाशी पोटी तीन ते चार गोळ्या प्रत्येक दिवशी अशा तीन दिवस खाणे गरजेचे आहे. गोळ्या घेतल्यानंतर 15 ते 30 मिनिट काही खायचे नाही ज्या दिवशी गोळ्या खाणार आहेत त्या दिवशी कच्चा कांदा व लसुण खाऊ नये, कॉफी पिऊ नये असे सांगण्यात आले आहे. या गोळ्यांचे वाटप ग्रामपंचायत लेखनिक सोमनाथ सोनवलकर, शिपाई पठाण व पाणी पुरवठा शिपाई प्रमोद दडस यांनी सोशल डिंस्टसिंग ठेऊन घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला एक डबी या प्रमाणे केले आहे.