दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । करंजखोप येथील सुमारे 300 नागरिकांना क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, फलटण यांचे वतीने मास्क, सॅनिटायजर, व्हिटॅमिन सी गोळ्या, डेटॉल इत्यादी आरोग्य विषयक कीटचे मोफत वितरण करण्यात आले.
क्रांतिसूर्य प्रतिष्ठान अल्पावधीतच सामाजिक कार्यात पुढे येत असल्याचे दिसत आहे. केवळ फलटण शहरात किंवा तालुक्यात मर्यादीत काम न करता संपूर्ण जिल्ह्यात काम करण्याचे उद्दीष्ठ पुढे ठेवत स्वखर्चातून सातारा जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद नेवसे क्रांतिसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. या कार्याचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत असून या पुढे विविध माध्यमातून आणि स्वतःचा मोठेपणा न दाखवता हे कार्य पुढे नेण्याचा मानस मिलिंद नेवसे यांनी व्यक्त केला.
करंजखोपच्या ग्रामपंचायत सदस्या सौ.वैशाली उमेश धुमाळ, माजी उपसरपंच संदिप धुमाळ, कोरेगाव तालुका आयडियल जर्नालिस्ट असोशियनचे अध्यक्ष संतोष धुमाळ, कै. उदयसिंह धुमाळ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ, अक्षय धुमाळ, अतुल धुमाळ आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.