श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धुळदेवमधील गरजुंना किराणा किट्सचे वाटप


स्थैर्य, फलटण, दि. २९ : सध्या फलटण तालुक्यामध्ये गेले काही महिने लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेक हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. हे जाणूनच फलटण येथील श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धुळदेव ता. फलटण येथील गरजू मजूर वर्गाला किराणा मालाच्या किट्सचे वाटप करण्यात आलेले आहे.

या वेळी श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठान खजिनदार एस. आर. लोहार, विश्वस्त संजय चिटणीस, महेश आडकर, अमोल कुमठेकर, व्यंकट दडस, कैलास पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या वेळी धुळदेव गावातील नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!