दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण – पर्युषन पर्वानिमित्त खास फलटण बस स्थानकावरील फेरीवाले यांना सामाजिक बांधिलकी म्हणुन जैन सोशल ग्रुप, फलटण मार्फत दातारांच्या सहकार्याने किराणा कीट वाटप करण्यात आले.
कोव्हिड मुळे एस.टी,बसेस कमी प्रमाणात सुरु असल्याने व प्रवाशी संख्या कमी झाल्याने फेरीवाले यांची आर्थीक अडचण झाली होती. त्यांना किराणा कीट वाटप करुन जैन सोशल ग्रुप,फलटणने एक उत्तम सामाजीक बांधीलकी जपल्याचे एस.टी.अधिकारी देसाई यांनी प्रतिपादन केले.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सुर्यकांत दोशी, उपाध्यक्ष अजितकुमार दोशी, सचिव श्रीपाल जैन, खजिनदार प्रीतम शहा, सह-खजिनदार समीर शहा, संगीनी अध्यक्षा संगिता दोशी, सहाय्यक वाहतुक निरीक्षक अशोक जाधव, धिरज अहिवळे, आगार लेखाकार माने, जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संचालक अजीत दोशी, डॉ. मिलिंद दोशी, संगीनी सचिव पोर्णिमा शहा, सहसचिव अपर्णा जैन, संगीनी माजी अध्याक्षा निनाभाभी कोठारी उपस्थीत होत्या.
या कार्यक्रमामधेच चालक दिनानिमित्त फलटण आगारातील जेष्ठ एस.टी.चालकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राजेंद्र कोठारी, डॉ.सुर्यकांत दोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जैन धर्मातील पर्युषन पर्वाचे महत्व विषद करुन सांगीतले. सर्व फेरीवाले यांनी जैन सोशल ग्रुपला धन्यवाद दिले. सचिव श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.