
स्थैर्य, म्हसवड दि.२७ : पानवण ता. माण येथील बालकाश्रमास मानवाधिकार सुरक्षा संघटना च्या सर्व पदाधिकार्यांनी भेट देत तेथील बालकांसाठी खाऊचे व किराणा साहित्याचे वाटप केले.
सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सदर बालकाश्रमातील मुलांची व त्यांचे संगोपन करणार्यांची उपासमार होवु नये यासाठी मानवाधिकार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी एकत्र येत सदर बालकाश्रमासाठी काहीतरी ठोस मदत करण्याचा निर्णय घेत सदर आश्रमाला भेट देत त्यांना किराणा व गरजु वस्तुंचे वाटप केले.
मानवाधिकार संघटनेच्या भेटीने तेथील वास्तव्यास असणाऱ्या सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले.
सध्या असणाऱ्या लॉक डाऊन च्या काळात अनेक संस्थांकडे दुर्लक्ष होत आहे, खरी गरज ओळखुन मानवाधिकार संघटनेतील सर्व पदाधिकारी यांनी आपल्या परीने या आनाथश्रमास मदत केली .
अनाथाश्रमातील रमाताई तोरणे यांनी या मदतीसाठी या संघटनेचे आभार मानले यावेळी तानाजी चव्हाण (प.महाराष्ट्र उपाध्यक्ष ), नागेश चौधरी (प.महाराष्ट्र संपर्क प्रमुख ), डॉ सोमनाथ मोरे (सातारा जिल्हा अध्यक्ष), डॉ अमोल बाबर ( सातारा जिल्हा कार्याध्यक्ष), वीरधवल ढवळीकर( सातारा जिल्हा उपाध्यक्ष), राजू जाधव (जिल्हा युवक कार्यकारि अध्यक्ष ), श्रीकांत भंडारे,(जिल्हा सरचिटणीस ) मारुती पवार (खटाव तालुकाध्यक्ष), संजय पांढरे ( माण तालुकाध्यक्ष ) , विजय पवार (तालुका कार्यकारी अध्यक्ष ) हे सर्व जण उपस्थित होते.