
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त झिरपवाडी येथील ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांना माजी नगरसेवक नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यावतीने फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव हे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. लोकनेते हिंदुराव नाईक नाईक निंबाळकर व अशोकराव जाधव यांचे संबंध हे संबंध फलटण शहराला ज्ञात आहेत.
यावेळी ह.भ.प केशवराव जाधव महाराज, पप्पू महाराज जाधव, माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.