दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.१३ ते १५ ऑगस्ट२०२२ या कालावधीमध्ये “घरो घरी तिरंगा” ‘हर घर तिरंगा’ या आभियानात मौजे सासकल ता. फलटण येथील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येत आहे.
सर्व ग्रामस्थांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर ग्रामस्थांनी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आव्हान ग्रामपंचायत सासकलच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सासकल गावठाणासह गावातील वाड्यावस्त्यांवर राष्ट्रध्वज मोफत देण्यात आले आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच उषादेवी फुले, सदस्य मोहन मुळीक, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी मुळीक, उपाध्यक्ष विनायक मदने, सुनिता मुळीक, इंदुमती मुळीक, मंगेश मुळीक, दत्तात्रय मुळीक,संजय खुडे, सोमिनाथ घोरपडे, बाळासाहेब कुंभार, बाबा फरांदे, शिर्के, दशरथ मुळीक, आकांशा पवार, हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अशोक मिंड म्हणाले की, सासकल मधील सर्व ग्रामस्थांनी या अभियानामध्ये उस्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी सर्व वाड्या-वस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही तिरंगा/ राष्ट्रध्वज मोफत देत आहोत. शासनाने या अभियाना अंतर्गत सुचवलेले सर्वच उपक्रम हे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात येतील.