श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत अहिवळे मित्र परिवाराच्यावतीने अंध – अपंगांना अन्नधान्याचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १७: फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शांताराम अहिवळे मित्र परिवाराच्यावतीने मंगळवार पेठेतील 25 अंध – अपंग व्यक्तींना अन्नधान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले.

यावेळी मराठा महासंघाचे नानासाहेब पवार, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, गुणवरे गावचे उपसरपंच, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, आरपीआयचे जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, फलटण तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, फलटण तालुका उपाध्यक्ष सतिश अहिवळे, सातारा जिल्हा अपंग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, दिक्षा दिव्यांग स्वयंसहाय्यता बचत गटाचे सचिव संतोष काकडे, पत्रकार सचिन मोरे, गोविंद मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाबद्दल बोलताना, माजी नगरसेवक स्व.गणेश शांताराम अहिवळे यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केला असून समाजातील गरजूंना जमेल तेवढी मदत करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहणार असल्याचे, प्रशांत अहिवळे यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!