दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२३ | फलटण |
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज फलटण नगरीत आगमन झाले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने अहिल्यादेवी नगर, गजानन चौक, फलटण येथे पालखी सोहळ्यातील हजारो वारकर्यांना अन्नदान वाटप व नेत्र तपासणी शिबीर भरविले होते.
या कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू मारूडा, समाजसेवक श्री. संदीप भाऊ चोरमले व उद्योजक सौ. स्वातीताई संदीप चोरमले, समाजसेविका डॉ. लताताई मोरे, सौ. नंदा मारूडा व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्नदान व नेत्र शिबिराचा शेकडो वारकर्यांनी यावेळी लाभ घेतला. तसेच मंडळाच्या या उपक्रमाचे अनेक वारकर्यांनी कौतुक केले.