
दैनिक स्थैर्य । 4 मार्च 2025। फलटण । येथील येथील सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर मधुकर गजफोडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने विमानतळ येथे शहरातील मोकाट फिरणार्या गायी व विविध जनावरांना चार्याचे चारा वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. अशाप्रकारे गजफोडे यांनी आगळा वेगळा वाढदिवस मित्रांसमवेत साजता केला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. परिसरात चारा टंचाई भासत आहे. सध्याच्या काळात घरातील पाळीव जनावरांना पुरेसा चारा दिला जात नाही. अशातच मोकाट जनावरांना चारा कुठून मिळणार?. याचा विचार करून हरेश्वर गजफोडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चारा वाटप केले.
अशा प्रकारे चारा वाटप करण्याचे दुर्मिळ उदाहरण आहे. त्यांच्या या कृतीमुळे तरुण पिढीपुढे आदर्श उदाहरण गजफोडे यांनी निर्माण केले आहे.