गुहागर येथे चक्रीवादळात नुकसान झालेल्या पीडितांना बौद्धजन सहकारी संघातर्फे आर्थिक मदतीचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२३ । गुहागर । कोकणातील गुहागर तालुक्यात जुलै महिन्यात पहाटे तीन-साडेतीनच्या दरम्यान अचानक आलेल्या चक्रीवादळात पवार साखरी, पिंपर, तळवली या गावांतील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सदर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गोरगरीब कुटुंबाचे व त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून सतत पडणारा मुसळधार पाऊस व वादळवारा यामुळे लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे सदर आपत्तीची दखल घेत गुहागर तालुक्यातील मातृतुल्य संस्था बौध्दजन सहकारी संघ गाव-मुंबई शाखा, विश्वस्त मंडळ, विभाग अधिकारी, संलग्न सर्व समित्या यांची ऑनलाइन कोन्सिल सभा घेण्यात आली व सदर ऑनलाइन कोन्सिल सभेत संघाद्वारे मदतनिधी उभा करून पीडितांना आर्थिक सहाय्य देणगी स्वरूपात देऊन त्यांना मदत करण्याचा ठराव पारित करण्यात आला; सदर ठरावानुसार तालुक्यातील आजी-माजी कार्यकर्ते, विभाग शाखा यांचे सर्व कार्यकर्ते आणि उपासक उपासिकांनी मोठ्या उत्साहाने सदर मदतकार्यास भरभरून आर्थिक सहकार्य करून मोठ्या स्वरूपातील मदतनिधी उभा केला. तद्नंतर बौध्दजन सहकारी संघ गाव-मुंबई शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, सरचिटणीस संदेश गमरे, पवार साखरी शाखा क्र. २० चे कार्यकर्ते, विभाग क्र. ७ चे विभाग अधिकारी सचिन गमरे व सर्व कार्यकर्ते, मुंबईचे माजी अध्यक्ष व पेवे विभाग क्र. २ चे हिशोब तपासणीस सुदर्शन मोहिते, पवार साखरी मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष मनोज गमरे, कुडली विभाग ७ च्या कोषाध्यक्ष लताबाई गमरे, पवार साखरी गाव शाखेचे अध्यक्ष प्रकाश मोहिते, सरचिटणीस विकास मोहिते, उपाध्यक्ष शरद गमरे, माजी अध्यक्ष व माजी विश्वस्त मारुती मोहिते, माजी अध्यक्ष चंद्रकांत मोहिते, माजी चिटणीस राजेंद्र मोहिते, गाव संघाचे सचिव विश्वास मोहिते तसेच गाव-मुंबई कार्यकारिणी या शिष्टमंडळाने चक्रीवादळ पीडित कुटुंबांना भेट देऊन नुकसांनाची पाहणी करून त्यांना दिलासा व आधार दिला व नुकसानानुसार प्रत्येकास आर्थिक सहाय्य म्हणून मदतनिधी वाटप करण्यात आला.

सदर प्रसंगी मोडून पडलेले संसार व उध्वस्त झालेले जनजीवन बघून शिष्टमंडळातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते व सर्वांचे मन भरून आले होते सरचिटणीस संदेश गमरे म्हणाले की “सदर आपत्तीमुळे झालेले आर्थिक नुकसान हे काही अंशी भरून काढता येईल परंतु माणसाचे घर आणि त्याचा संसार हा मायेच्या पायावर भावनेच्या विटांनी बनलेला असतो त्याचे नुकसान कधीही कोणी भरून काढू शकत नाही, आपण एकमेकांचे सगेसोयरे नसलो तरी माणुसकीच्या धाग्यांनी आपण सर्व बांधले गेलेलो आहोत म्हणूनच आम्ही आज त्याच माणुसकीच्या भावनिक नात्यांनी जी मदत करीत आहोत ती आपण स्वीकार करावी” तसेच मुंबई संघाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनीही पीडितांना दिलासा देताना सांगितले की “पीडित बांधवांच्या मदतीसाठी मुंबई संघ नेहमीच तत्पर असेल, नुकसान भरपाई भरून काढणे जरी अशक्य असले तरी शक्य ती सर्व मदत संघाद्वारे नेहमीच केली जाईल, पीडितांच्या हाकेसाठी मुंबई संघ नेहमीच धावून येईल.”

तद्नंतर सहकारी संघाच्या जानावळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे गाव शाखेच्या वतीने सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमास ही सदर शिष्टमंडळाने भेट देऊन स्थानिक कार्यकर्ते, उपासक, उपसिकांना मार्गदर्शनापर विचार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन सदर शिष्टमंडळ मुंबईस रवाना झाले.


Back to top button
Don`t copy text!