
स्थैर्य, फलटण दि.१९: फलटण शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील बाणगंगा नदी शेजारील शनिनगर, चाँदतारा मस्जिद पाठीमागील काही भाग, पठाणवाडा येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 30 कुटुंबियांना महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंच्या 30 किट्सचे वाटप नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शनिनगर, चाँदतारा मस्जिद पाठीमागील व पठाणवाडा भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.