
स्थैर्य, फलटण, दि.२५: कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे गोरगरीब आणि रोजंदारीत काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत सद्गुरु व महाराजा उद्योग समूह फलटण यांच्या वतीने फलटण येथील प्रभाग क्रमांक- ११ मधील पाचशे गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वितरण करून मदतीचा हात दिला आहे.

सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली,स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा व फलटण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती अँड. सौ. मधुबाला भोसले यांच्या सहकार्याने प्रभाग ११ मधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे कीट श्री.सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजीतसिंह भोसले , सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सी.ई .ओ.संदीप जगताप, संचालक गिरीष फणसे, यांचे हस्ते वाटप करण्यात आले .
या मदतीमूळे नागरिकांच्यात समाधान दिसून आले.या वेळी मास्क लावून, सोशल डीस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. प्रत्येकाने घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन दिलीपसिंह भोसले यांनी केले.