बौद्धजन सहकारी संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । गुहागर । बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या संघाच्या विद्यमाने जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मुक्काम गाव जानवळे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय विश्‍वनाथ कदम साहेब, अध्यक्ष माजी सैनिक आदरणीय सुनील जाधव साहेब, सरचिटणीस आदरणीय महेंद्रजी मोहिते साहेब यांच्या शुभहस्ते सर्व शिक्षकवृंदाच्या उपस्थिततीत करण्यात आले.

“राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन, आम्ही त्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक शाळांमध्ये सर्व समाजातील, सर्व स्तरातील विद्यार्थ्यांकरता मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करत होतो, करत आहे आणि यापुढेही अविरतपणे करत राहू; ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल व त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेण्याकरता आमचा खारीचा वाटा म्हणून हातभार लागेल” असे उद्गार अध्यक्ष आदरणीय सुनील जाधव यांनी आपल्या भाषणात नमूद केले. बौद्धजन सहकारी संघाने केलेल्या अमूल्य मदतीबाबत जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जाणवळे याच्या मुख्याध्यापकांनी संघाचे व संघाच्या सर्वच पदाधिकारी, सभासद यांचे कौतुक करत म्हटले की “वर्षावासचे औचित्य साधून आपण करत असलेला उपक्रम हा स्तुत्य उपक्रम असून त्याकरता आम्ही संघ, संघाचे माननीय पदाधिकारी व सभासद यांचे आभार मानतो व उत्तरोत्तर त्यांच्या कार्यात त्यांना यश कीर्ती व समाधान लाभत राहो व त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य अविरत घडत राहो” असे गौरवोद्गार काढत माननीय मुख्याध्यापकांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!