श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेत शैक्षणिक साहित्याचे वाटप


दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । येथील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेमध्ये प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूल बॅग, वह्या इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार युवराज पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले उपस्थित होते.

युवराज पवार म्हणाले, प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत राबवले जाणारे उपक्रम निश्चितच स्तुत्य असून इतरांना प्रेरणादायी ठरतील असे आहेत. या योजनेसाठी आपले सहकार्य निश्चित राहील, अशी ही ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

दिलीपसिंह भोसले म्हणाले, प्रियदर्शनी दत्तक योजनेअंतर्गत गरजू व गुणवंत सुमारे 100 मुलींना दरवर्षी शालोपयोगी साहित्य, गणवेश तसेच मेडिकल उपचार व मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर शिवम प्रतिष्ठान घारेवाडी अंतर्गत जे उपक्रम राबविले जातात या उपक्रमाचाही लाभ या मुलींना दिला जातो. आनंदवन प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सौ. रुपाली सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक नागेश पाठक, शिक्षक, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!