माढा उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत कोरोना प्रतिकारक साहीत्य वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : माढा उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत सुमारे ३०० अधिकारी व कर्मचा-यांना कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून हेल्मेट मास्क, रोग प्रतिकारक गोळ्या, हँडवॅाश व सॅनीटायझर किटचे वाटप प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी केले.

कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना सातत्याने नागरिकांशी येणारा संपर्क पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या माढा तालुक्यातील १४० व करमाळा तालुक्यातील १२० व प्रांत कार्यालयातील कर्मचारी असे सुमारे ३०० अधिकारी व कर्मचा-यांना प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी हेल्मेट मास्क, हँडवॅाश, सॅनीटायझर व अर्सेनिक अल्बम -३० या रोग प्रतिकारक गोळयांचे किट वाटप करण्यात आले.

यामध्ये माढा व करमाळा येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी,नगर परिषद मुख्याधिकारी पोलिस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी, मंडलाधिकारी, अव्वलकारकून तलाठी व कोतवाल अशा सर्वांना हे किट देऊन कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रांताधिकारी कदम यांनी प्रबोधन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!