स्थैर्य, खटाव, दि. 25 : पळशी, ता. माण येथे माजी विद्यार्थी संघाकडून प्रभावती हिराचंद खाडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून गावात मास्क, सॅनिटरीरायझर, हॅन्डवॉश व अर्सेनिकम अल्बम-30 चे वाटप प्रत्येकी एक हजार करण्यात आले.
सध्या जगभरात करोना सारख्या भयानक आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपले संभाळणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही मास्क व सॅनिटरीरायझर बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागात मुंबई व पुण्यावरून लोक आल्याने करोना ने शिरकाव केला आहे. हा शिरकाव रोखण्यासाठी पळशी येथे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या माजी विद्यार्थी संघाने प्रभावती हिराचंद खाडे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून संघाने गावात एक हजार लोकांना मास्क, सॅनिटरीरायझर, हॅन्डवॉश व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘अर्सेनिकम अल्बम-30’ ह्या होमिओपॅथीक गोळ्या उपयुक्त ठरत असल्यामुळे त्याचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांना प्रत्येकी पन्नास कुटुंबाचे वाटपाचे नियोजन ठरवून दिले. तसेच गर्भवती महिला, होम क्वारंटाईन केलेले, अति गंभीर रूग्ण यांना प्राधान्याने करण्याचे नियोजन केलेले आहे. तसेच पळशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चांगल्या सेवेचे कौतुक हेमंतकुमार खाडे यांनी केले. होमिओपॅथीक गोळ्या घेणे बाबतच्या डॉ. प्रियाजंली वाळवेकर यांनी दिलेल्या सूचनांचे पत्रक प्रत्येक पाकीटामध्ये दिलेले आहे. या कार्यक्रमासाठी पळशीचे सरपंच शंकर देवकुळे, उपसरपंच सुनिल खाडे, चेअरमन प्रमोद खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभांगी कुंभार, कर्मचारी, विद्यार्थी संघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.