मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांच्या धनादेशांचे वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि. १८ : मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख तर अन्य दुर्घटनाबाधितांना देखील आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वितरण मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

जुलै महिन्याच्या १६ तारखेला मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील इमारतीचा वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकुण २ जण मृत्यूमुखी पडले होते तर १३ जण जखमी झाले होते.

याप्रसंगी तहसिलदार श्री.विनोद धोत्रे, तलाठी श्रीमती मनिषा नागले आदी मान्यवर उपस्थित होते. मृतांच्या नातेवाईकांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!