काटेवाडी मध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । बारामती । माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना. शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिपक लोंढे यांनी केले होते.

संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर पप्पू राखपसरे काटेवाडी चे सरपंच. विद्याधर काटे. उपसरपंच. श्रीधर घुले. तंटामुक्ती अध्यक्ष. के. टी. अप्पा जाधव व संजय काटे,अनिल भाऊ काटे, शितल भैय्या काटे, शाळा समिती अध्यक्ष धनंजय काळे,शारधा प्रतिष्ठान चे अध्यक्ष.कुलदीप शेंडगे,गणेश देवकाते, विशाल सुतार, निहाल शेख कुलदीप जाधव,नंदकिशोर लोणकर, बाळासाहेब लोंढे, महादेव लोंढे, महेश खवले,उमेश लोंढे,मनीष लोंढे, अमीर पठाण,बबन पाथरकर,बनेश पाटील, शशिकांत कांबळे, संदीप झगडे, सागर पाटील आदी मान्यवर व जिल्हा परिषद शाळे मधील शिक्षकवृंद, पालक उपस्तित होते. नंदकिशोर लोणकर यांनी आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!