श्रीमंत विश्वजितराजेंच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सायकलचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सासवड येथे युवा उद्योजक अमोल शिवाजीराव रासकर यांच्या वतीने महात्मा फुले हायस्कूल व जुनिअर कॉलेज, सासवड येथील विद्यार्थिनींना सायकल व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.

अमोल रासकर यांच्या माध्यमातून गेल्या पाच सहा वर्षापासून सासवड गावातील आर्थिक परिस्थिती नाजुक असणाऱ्या गरजु सोळा विद्यार्थी हे सर्व शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीना 2-3 किमी वरून शाळेत चालत येत असत त्यामुळे हे लक्षात घेऊन व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून अमोल रासकर यांनी स्वखर्चाने या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.

यावेळेस सासवड गावचे माजी सरपंच पांडुरंग जाधव, मधुकर भुजबळ, पंढरीनाथ जाधव, आबा खताळ, नवनाथ जगताप, संतोष जाधव, जितू काकडे, नवनाथ सुळ, अजित कारंडे, सागर सुळ, सचिन रासकर, चेतन जाधव तसेच ग्रामस्थ आणि महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!