स्थैर्य, फलटण, दि. २६ : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक हे कोरोनावर उपचार घेत आहेत. त्या ठिकाणी मेकिंग इंडिया डिफरन्स आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमातून १८ बेड्स, २५ पीपीई किट्स व सॅनिटायझरचे नुकतेच वाटप करण्यात आलेले आहे. मेकिंग इंडिया डिफरन्स आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून वरील सामुग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. व्यंकट धवन यांनी आभार मानले. या वेळी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार हे उपस्थित होते.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन यांच्याकडे १८ बेड्स, २५ पीपीई किट्स व सॅनिटायझरचे हस्तांतरण करताना मेकिंग इंडिया डिफरन्स आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार यांच्या समवेत श्रीमती नीता कांबळे, अनिल कर्णे, संजय कुचेकर, अभिजित घोरपडे, नवनाथ कारे यांची उपस्थिती होती.