वनमंत्री व कृषीमंत्र्यांच्या हस्ते बांबू व सागवानच्या रोपांचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


वणी येथील मंदर नर्सरीमध्ये केले वृक्षारोपण

स्थैर्य, यवतमाळ, दि. 5 : राज्यात वन महोत्सव-2020 ला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने वनमंत्री संजय राठोड आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वणी तालुक्यातील मंदर येथील नर्सरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांबू आणि सागवान रोपांचे वाटप करण्यात आले.

वणी तालुक्यातील मंदर या वनविभागाच्या रोपवाटिकेत वनमंत्री संजय राठोड, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अटल आनंद घनवनचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक के. अभर्णा, माजी आमदार विश्वास नांदेकर आदींनी वृक्षांची लागवड केली.

सहायक वनसंरक्षक अनंत दिघोळे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, आशिष कुळसंगे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्री. धनमाने, एस. एन. पांधरे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!