वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । बीड । राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी, बोरीपिंपळगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीची पंचनामे युद्धपातळीवर करुन अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तसेच बीड तालुक्यातील तिप्पटवाडी तसेच घोसापुरी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. तिप्पटवाडी येथील शेतकरी अनंत नामदेव शेंडगे यांचे व घोसापुरी येथील शेतकरी श्रीहरी कुटे यांचे प्रत्येकी दोन बैल वीज पडून दगावले होते. या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेत मदतीचे धनादेश या पशुपालकांना पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!