स्थैर्य, राजुरी: गुणवरे ता. फलटण येथील येथील दोशी गुणवरेकर कुंटुंबियांच्यावतीने ग्रामस्थांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अर्सेनिक अल्बम 30 चे वितरण गुणवरे ग्रामपंचायतीच्या समोर सोशल डिस्टंन्सचे पालन करून वाटप करण्यात आले आहे.
दोशी कुंटुंब सध्या व्यवसायानिमित्त फलटण या ठिकाणी स्थायिक झाले आहे. पण गावाकडचे त्यांचे प्रेम त्यांनी आजतागायत कायम ठेवले आहे. गावच्या लोकांना कोरोना वायरस रोगाच्या प्रतिकारासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गुणवरे गावच्या सरपंच सौ. प्रविणाताई गावडे, उपसरपंच दादा मुळीक, साहाय्यक निबंधक जे.पी. गावडे, प्रगतशील शेतकरी बाहुबलीशेठ दोशी, अरिहंत टि. व्ही. एस. चे मंगेशशेठ दोशी, शंशाक दोशी, नंदिश्वर दोशी, श्रीपाल जैन, डॉ. अतुल दोशी, तुकाराम गावडे, बाळासाहेब गौंड, सदस्य गणेश भोसले, कैलास आढाव, सदाशेठ गावडे, हरिषचंद्र नाळे, महाराष्ट्र राज्य हिंदू शेगर समाज महासंघाचे सदस्य शिवलाल गावडे, आरोग्य सेविका सुळ, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, युवराज सांगळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेवीका व ग्रामस्थ उपस्थित होते. या गोळ्या गावातील कुटुंबांना अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेवीका मार्फत घरपोहोच दिल्या जाणार आहेत.
यावेळी शिवलाल गावडे सर, बाळासाहेब गौंड यांनी मनोगते व्यक्त केली. ग्रामविकास अधिकारी गणेश दडस यांनी आभार मानले.