आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार अर्सेनिक अल्बम 30 चे आयकर उपायुक्त तुषार मोहिते यांच्या वतीने वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ५ : कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट अद्याप कमी झाले नसून शासनाच्या सूचनांचे सर्वांनी पालक करणे अत्यावश्यक आहे. कोरोना विरुद्ध लढताना प्रत्येकाची प्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्या अत्यंत गुणकारी असून त्याचे योग्यप्रमाणात सेवन सर्वांनी करावे, असे आवाहन आयकर विभाग, पुणेचे उपायुक्त तुषार मोहिते यांनी केले.

तुषार मोहिते यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपली सामाजिक बांधिलकी जपत सुरवडीसह तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत सुरु ठेवली आहे. याच मदत कार्यातील एक भाग म्हणून तुषार मोहिते यांच्यावतीने तालुक्यातील सुरवडी, नांदल, खराडवाडी, डोंबाळवाडी, संगमनगर, धुळदेव, निरगुडी, मांडवखडक, दालवडी या गावात अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. 

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आर्सेनिकम अल्बम 30  या गोळ्या उपयुक्त आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती नक्की वाढेल. याचा फायदा कोरोनाच्या या लढ्यात होणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. शिवाय, कुणावर इतर कोणत्या रोगाचा इलाज सुरू असल्यास देखील या गोळ्या घेता येणार आहेत. रोज उपाशी पोटी तीन गोळ्या केवळ तीन दिवस घ्यावी लागतील.

कोरोनापासून बचावासाठी विनाकारण घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा. वारंवार हात स्वच्छ धुवा. घरातील 60 वर्षावरील व 15 वर्षाखालील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कुटुंबात किंवा शेजारी अथवा परिसरातील कोणतीही व्यक्ती कोरोना बाधीत क्षेत्रामधून आल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयकर विभाग, पुणेचे उपायुक्त तुषार मोहिते यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!