दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । फलटण । फलटण तालुक्यामधील शेतकऱ्यांनी शेती औजारांचे अर्ज पंचायत समिती कार्यालय मध्ये जमा केलेले आहेत. सदर अर्ज हे विहित औजारांपेक्षा जास्त आल्याने औजारांचे वाटप हे लॉटरी पद्धतीने करणार असल्याचे माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.
मंगळवार, दि. ०२ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शेती औजारांचे वाटप जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज पंचायत समितीकडे सादर केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी सदरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी केलेले आहे.