फलटणमध्ये दुसऱ्यांदा अर्सेनिक अल्बम ३० चे वाटप : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना या आजाराच्या महामारीवर अर्सेनिक अल्बम ३० चा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वापर केल्यास फायदा होत असल्याचे आढळून आले आहे. म्हणून संपूर्ण देशभर अनेक ठिकाणी या औषधाचा वापर करण्यात आलेला आहे. यापूर्वी ही फलटण नगरपरिषदेने दोन महिन्यापूर्वी आर्सेनिक अल्बम ३० या औषधाचा पहिला डोस फलटण शहरामध्ये दिला होता. त्याचा चांगला परिणाम  दिसून आलेला आहे.  म्हणून दोन दिवसापासून फलटण शहरामध्ये अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे दुसऱ्यांदा वाटप सुरू करण्यात आलेले आहे. अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धि पत्रकात प्रसाद काटकर पुढे म्हणाले की, संपूर्ण फलटण तालुक्यासह शहरात मध्ये ही कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार वाढू लागलेला आहे. या कारणामुळे या साथीला आटोक्यात आणण्यासाठी या अर्सनिक अल्बम – 30 हे औषध प्रभावी ठरत असल्यामुळेच संपूर्ण फलटण  शहरात याचे मोफत वाटप दुसऱ्यांदा सुरू करण्यात आले असून  घरातील प्रत्येक व्यक्तीने एका वेळी चार गोळ्या अनुशापोटी असे तीन दिवस तीन डोस घेणे आहे.  त्याचबरोबर आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेला आयुर्वेदिक काढा सुद्धा घेतला तर तो प्रभावी ठरत आहे. असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करून प्रसाद काटकर पुढे म्हणतात की,  फलटण शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी नगर परिषद प्रशासनाशी तात्काळ संपर्क करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या शेजारी जर कोणी व्यक्ती बाहेरून  आला असेल तर त्याची माहिती नगरपालिकेला ताबडतोब देण्यात यावी म्हणजे हा संसर्ग रोखण्यामध्ये आपणास यश मिळणार आहे.

तसेच वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा व मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे आपण या आजाराला सामोरे गेलो तर निश्चितपणे आपण आपले शहर कोरोना मुक्त करू शकतो असा विश्वासही प्रसाद काटकर यांनी शेवटी व्यक्त केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!