१ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याचे वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । शेतकरी उत्पादक संस्था यांना समभाग निधी योजनेअंतर्गत निधी वितरण करणे, शेतकरी उत्पादक संस्थेच्या शेतक-यांशी संवाद साधणे तसेच पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याचा लाभ पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते   दि. ०१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजता वितरीत करण्यात येणार आहे. हा  कार्यक्रम ऑनलाइनआयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी  पंतप्रधान शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.

या  कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी किसान / डीडी नॅशनल (राष्ट्रीय दुरदर्शन) वर केले जाईल. तसेच या कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in वर देखील उपलब्ध होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत – जास्त शेतक-यांनी या  ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!