दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | शहरातील मारवाड पेठ येथे गेले अनेक वर्षे एक मनोरुग्ण महिला हि वास्तव्यास आहे. तिचे घरचे म्हणजेच मुलगा, मुलगी व सून आली तरी सुद्धा ती त्यांना ओळखत नाही व त्यांच्यासोबत जाण्यास सुद्धा तयार होत नाही. प्रत्येक जण आपल्या कुटुंबीय व प्रियजनांच्यासोबत दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असतो.
परंतु अनुप शहा यांनी दिवाळी हा सण मनोरुंग महिलेला तिच्या मुलगा व मुलीच्या समोर दिवाळी फराळ खायला घातले. तिला साडी चोळी सुद्धा दिली.
अनुप शहा यांनी दिलेली साडी त्या महिलेला तिच्या मुलीने नेसवली. सदरील महिला हि मनोरुग्ण असल्याने ती तिच्या घरी जाण्यास तयार होत नाही. मुलगा पुण्यात व मुलगी हि म्हसवड येथे सासरी असल्याने ते नियमित लक्ष देवू शकत नाहीत.
यावेळी बोलताना अनुप शहा म्हणाले कि; प्रत्येक नागरिक हा आपल्या घरी दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असतो. प्रत्येकाला असे वाटत असते कि आपले आई, वडील किंवा आपल्या प्रियजनांच्या सोबत आपण दिवाळी साजरी केली पाहिजे.
मारवाड पेठ येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक मनोरुग्ण महिला राहत आहे. तिचा मुलगा, मुलगी आले तरी सुद्धा ती त्यांच्यासोबत घरी जात नाही. त्यामुळे तिच्या मुलांच्या समवेत आम्ही तिच्यासोबत दिवाळी साजरी केली.
तिला फराळ खायला घातला. भाऊबीजेच्या निमित्ताने तिला साडी चोळी भेट दिली.