नियमीत पाण्याच्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी हंगामात पाणी वाटप करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । सातारा । नियमीत पाण्याच्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचे वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समितीची उन्हाळी हंगामासाठीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी या सूचना दिल्या. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्व श्री. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार दोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, अरुण लाड, अनिल बाबर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रीत उपस्थित होते.

वसना-वांगडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याबाबतचा तसेच धोम व बलकवडी धरणाच्या पाणी पट्टीमधील दरामध्ये असलेल्या तफावती बाबतचा व तरतुदीप्रमाणे पाणी दिले जात नसल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच माण व खटावसाठीचे आवर्तण 10 मे पर्यंत सूरू ठेवावे. लोक प्रतिनिधींशी चर्चा करून अद्ययावत प्रस्ताव सादर करावेत. प्रस्ताव तयार करताना प्राधान्य क्रम ठरवावा. नियमबाह्य तसेच शिल्लक आहे म्हणून एखाद्या क्षेत्राला पाणी दिले असे होऊ नये, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!