जि. प. शाळा विठ्ठलनगर येथे पालक-शिक्षक सभा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । आटपाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठल नगर येथे 13 ऑगस्ट, 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करून नंतर शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, विष्णू तम्मा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याध्यापिका, सौ. सुजाता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये सहा. शिक्षिका, सौ राजश्री संजय काळे व सौ सुरेखा वसंतराव मंडले यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या व इतर विविध विषयावर मार्गदर्शन केले. या सभेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करणे; गणवेश वाटप करणे; नियमितपने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे; घरी दैनंदिन अभ्यासक्रम करून घेणे; लोक वर्गणीतून विद्यार्थ्यांच्यासाठी शौचालय बांधणे; 15 ऑगस्ट, रोजी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, तसेच पुढील महिन्यात स्थापन करण्यात येणाऱ्या शालेय शिक्षण समितीची निवड, इत्यादी विषयावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आले. यावेळी लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांच्यासाठी शौचालयाचे बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी पालकांकडून मदत करण्याचे आव्हान करण्यात आले होते, तेव्हा पिसेवाडी गावचे पालक, मा. कैलास उद्धव पिसे यांनी शौचालय बांधकामासाठी दोन हजार रुपयाची वर्गणी रोख जमा केली. तसेच श्री प्रशांत पाटील यांनी शौचालय बांधकामासाठी लागणारे सिमेंट , वाळू व दरवाजे देण्याचे आश्वासन दिले. सर्व पालकांनी ही आप- आपल्यापरीने आर्थिक मदत करून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे ठरले. पालक शिक्षक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. नागेश चंदनशिवे यांनी केले, तर आभार सहा. शिक्षिका, सौ. सुरेखा मंडले यांनी मानले. सभेच्या कार्यक्रमास प्रशांत पाटील, नाथा पवार, विष्णू जाधव, कैलास पिसे, इत्यादी सह 35 महिला व पुरुष पालक-वर्ग उपस्थित होता. चहापान झाल्यानंतर सभेच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!